पुणे दिनांक ५ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज बुधवार अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे .तर अधिवेशनात राज्यातील विविध मुद्द्यांवरून विरोधक आज देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे, कालचा दिवस अबु आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्या मुळे कामकाज होऊ शकले नाही,तर आज देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणण्याचे वक्तव्य काॅग्रेस पक्षाचे आमदार नाना पटोले यांनी वक्तव्य केले होते.त्यांनी म्हटले आहे की सोमवारी ‘मुख्यमंत्री रात्री उशिरा ताफा घेऊन अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर जातात राजीनामा लिहून घेतात.व राजीनामा आल्यानंतर त्यांनी थेट माध्यमांसमोर येऊन सांगितलं.पण नियमानुसार मुख्यमंत्री यांनी याबाबत सभागृहाला माहिती देणे अपेक्षित होते.त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग आणणार आहोत ‘ असे काॅग्रेस पक्षाचे आमदार नाना पटोले यांनी म्हटले आहे.त्यामुळे विरोधक आज देखील आक्रमक होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आज तिसऱ्या दिवशीतर विधानसभेचे कामकाज व्यवस्थीत चालणार का? पाहाणे म्हत्वाचे ठरणार आहे,