पुणे दिनांक ६ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात आजपासून मराठी व अमराठी वाद चांगलाच पेटला आहे.त्यात आता महाराष्ट्राची राजधानी मुंबई मधील घाटकोपर येथील भाषा ही गुजराती आहे.असा शोध लागला आहे.व यातूनच आता राजकरणचा टेम्परेचर देखील आज हाय झाला आहे.दरम्यान मुंबई ही कायम उष्ण असते पण आज जरा जास्त आहे.त्याला कारण देखील तसेच आहे. दरम्यान मुंबईत मराठी बोलता आले पाहिजेच.असं नाही.असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी केले आहे.त्यामुळे मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना असे वक्तव्य आल्यानं विरोधी पक्षनेत्यांना आयतं कोलित हाती आले व सर्व यावर तुटून पडले आहेत.दरम्यान हा मुद्दा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे.आपण सर्व महाराष्ट्राटीयन असल्याने आपले देखील मातृभाषावर तेवढेच प्रेम आहे.आपण तिच्या पोटी जन्म घेतला आहे.त्यामुळे आम्हाला देखील मराठी भाषेचा सार्थ अभिमान आहे. पण असे वक्तव्य झाल्यानंतर राज्यात वाद हा होणार आहे.आता महानगरपालिकेच्या निवडणुका असल्याने कदाचित असे वक्तव्य केले असावे असे अनेक राजकारणी नेते मंडळीचे म्हणनं आहे.दरम्यान आज विधानभवनात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना माध्यामांनी प्रश्न विचारला असताना त्यांनी थेट गुजराती मधून बोलायला सुरुवात केली.व पत्रकारांना आणि नेत्यांना केम छो.केम छो.म्हणजेच कसे आहात? असे विचारु लागले.व नंतर त्यांनी गुजराती मधून रोष व्यक्त केला आहे.