पुणे दिनांक ७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही सोलापूर येथून आली असून.सोलापुर जिल्ह्यातील अकलूज येथील घटना असून बायको दुसरा विवाह करत असल्याने नव-याने सरळ पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिस स्टेशनमध्येच स्वतःला त्याने 🔥 आग लावून घेतली आहे.दरम्यान संबंधित युवकाचे नाव शेखर गायकवाड असं आहे.तो या आगीत ६० टक्के भाजला आहे.त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान यातील शेखर याचे लग्न झाले असून त्याची पत्नी ही माहेरी राहत होती .तिथे ती दुसरा विवाह करत असल्या बदल शेखरला माहिती मिळाली व तो अकलूज येथे सासवाडीला गेला.त्याचे बायको सोबत भांडण झाले.त्यामुळे त्यांने थेट पोलिस स्टेशन गाठले व अंगावर पेट्रोल टाकून आग लावली.व त्यानंतर जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागला.