पुणे दिनांक ८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दरवर्षी प्रमाणे ८ मार्च रोजी जगभरात मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला जातो.महिला दिन विशेष थीमसह साजरा करण्याची पद्धत आहे.यावर्षी महिला दिनाची थीम ‘Accelerate Action ‘ही आहे. दरम्यान गेल्या वर्षी महिला दिनाची थीम ‘inspire inclusion ‘ या संकल्पनेवर आधारित होती . women day 2025 गूगलवर देखील मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे.दरम्यान जगभरात आज महिला दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दरम्यान आज ८ मार्च जागतिक महिला दिन . जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी तसेच समाजातील ओळख अधोरेखित करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो.आजच्या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो.इतर महिलांना यातून प्रेरणा मिळावी.असा या मागचा मुख्य उद्देश असतो. महिलांना विविध भेटवस्तू.विविध पुरस्कार देऊन महिलांना प्रोत्साहन दिले जाते.