Home सामाजिक पुणे शहरात परिमंडळ ५ च्या वतीने आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त...

    पुणे शहरात परिमंडळ ५ च्या वतीने आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांची भव्य बाईक रॅलीचे आयोजन

    62
    0

    पुणे दिनांक ८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज ८ मार्च जागतिक महिला दिन बेटी…बेटी पढाओ (BBBP) या उपक्रमाला दिनांक २२ जानेवारी २५ रोजी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.या निमित्ताने ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुणे शहर पोलिस उपायुक्तालयातील महिला पोलिसांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने परिमंडळ ५ मधील महिला पोलिसांच्या वतीने आज ८ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता  महात्मा फुले सांस्कृतिक भवन.वानवडी ते एम.एस. जोशी काॅलेज हडपसर असे महिला पोलिस बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

    दरम्यान सदर कार्यक्रमाचे आयोजन पोलिस उपायुक्त परिमंडळ ५ चे डाॅ.राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ ५ मधील सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्या वतीने करण्यात येणार आहे.सदरच्या बाईक रॅलीस सिनेअभिनेता पुष्कर जोग व प्राजक्ता गायकवाड यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून सकाळी साडेदहा वाजता सुरुवात होणार आहे.सदर रॅलीचा मार्ग.महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी. वानवडी.बॅक ऑफ महाराष्ट्र चौक.फातिमानगर चौक डावीकडे वळून भैरोबा नाला चौक.यु टर्न सरळ ९३ .अव्हेन्यू माॅल चौक.काळुबाई जंक्शन चौक.रामटेकडी वैदवाडी चौक.मगरपट्टा चौक.गांधी चौक.माळवाडी  जंक्शन चौक.सरळ हडपसर.गाडीतळ .रविदर्शन चौक यु टर्न.हडपसर गाडीतळ चौक.माळवाडी जंक्शन चौक उजवीकडे वळून तुपे नाट्यगृह चौक.उजवीकडे वळून भारत गॅस चौक.डावीकडे वळून सरळ एस.एम.जोशी काॅलेज येथे समाप्त होईल.अशी माहिती देण्यात आली आहे.दरम्यान मराठी डिजीटल ई पेपर दैनिक पोलखोलनामाच्या वतीने ‘ महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ‘

    Previous articleयावर्षीच्या महिला दिनाची थीम खास काय आहे,८ मार्चला महिला दिन का साजरा केला जातो?
    Next articleपुण्यात कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरूच, सिंहगड रोडवर नवरा बायकोवर कोयत्याने हल्ला हल्लेखोर फरार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here