पुणे दिनांक ८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक खळबळजनक अपडेट ही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधून हाती आली असून. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात हुंदाई कंपनीत काम हे स्थानिक युवकांना न देता परप्रांतीयांना दिल्या नंतर स्थानिक युवकांना यांचा राग आल्यावर त्यांनी आज थोड्याच वेळापूर्वी परप्रांतीय कामगारांना चांगलाच चोप दिला आहे.दरम्यान या प्रकरणी परप्रांतीय कामगारांनी खेड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिल्या नंतर आता परप्रांतीय कामगारांना मारहाण करणाऱ्या स्थानिक युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.