पुणे दिनांक ८ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या कोथरूड मध्ये पुन्हा एकदा मारहाणीची घटना घडली आहे.दरम्यान सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोथरूड येथे गाडी आडवी लावण्याच्या कारणावरुन सदरची हाणामारी झाली आहे.सचिन मिसाळ आणि त्याच्या साथीदारांनी एका युवकाला बेदम मारहाण केली.या प्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तसेच कोथरूड पोलिसांनी 👮 सचिन मिसाळ याला अटक करण्यात आली आहे.तर इतर आरोपींचा कोथरूड पोलिस शोध घेत आहेत.दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.