पुणे दिनांक ९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी पुण्यातूनच एक खळबळ जनक अपडेट आली असून.काल ८ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महिला दिना दिवशी येरवडा येथील शास्त्री चौकात मध्यभागी रोड वर BMW उभी करुन फुटपाथवर महिला समोरच लघुशंका करुन अश्लील कृत्य केले होते.व त्याचा मित्र कार मध्येच मद्यप्राशन करत होता.दोघांजणांनी मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी करत होते.दरम्यान या दोघांजणांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी होणार आहे.त्यासाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात येणार आहे.त्यानंतर गौरव आहुजा व त्याचा मित्र ओसवाल आज शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.गौरव आहुजा रात्री उशिरा कराड पोलिसांना शरण आला आहे.आणि काल तसं एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकून सर्वांची माफी देखील नागरिकांची व पोलिस प्रशासनाची माफी मागितली होती.दरम्यान काल रात्री येरवडा पोलिसांनी 👮 त्याला कराड येथून पोलिसांच्या ताब्यातून घेऊन पुण्यात आणले आहे.