पुणे दिनांक ९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून आली आहे. दोनच दिवसांपूर्वी सतीश भोसले उर्फ खोक्याचा नको त्या पराक्रमामुळे सध्या भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातीचे आमदार सुरेश धस आता चांगलेच चर्चेत आले आहेत.दरम्यान बीड जिल्ह्यातीत महिला दिनाच्या कार्यक्रमाला बोलवून पोलिस अंमलदारानेच महिलेवर काल बलात्कार केला ही धक्कादायक घटना घडली होती.दरम्यान पाटोदा पोलिसांनी 👮 ठाणे अंमलदार उध्दव गडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आता त्याच बलात्कारी ठाणे अंमलदार बरोबर भारतीय जनता पार्टीचे पाटोदा कासारचे आमदार सुरेश धस यांच्या सोबतचे फोटो आहेत.त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.