Home अर्थ राज्याच्या आज अर्थसंकल्प दोन्ही सदनात दुपारी सादर होणार

    राज्याच्या आज अर्थसंकल्प दोन्ही सदनात दुपारी सादर होणार

    34
    0

    पुणे दिनांक १० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट ही मुंबईतून आली आहे.अर्थसंक्पीय अधिवेशन सुरू आहे.दरम्यान नवीन महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.दरम्यान निवडणुकीत ह्या सरकारने जनतेला खुप मोठ्या प्रमाणावर आश्वासन दिले होते. आज त्यातील किती आश्वासन हे सरकार पाळतात हे आज स्पष्ट होईल.यात प्रामुख्याने लाडकी बहीण योजना १.५०० वरुन २.१०० करणे शेतकऱ्यांना कर्जमाफी असे मुद्दे आहेत.दरम्यान आज १० मार्च राज्याचा सन २०२५ व २६ या वर्षाचा अर्थसंकल्प हा विधानसभा व विधान परिषदेत आज दुपारी दोन वाजता दोन्ही सदनात अर्थमंत्री अजित पवार यांच्या कडून सादर केला जाणार आहे.दरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांचा हा १३ वा अर्थसंकल्प आहे. दरम्यान आजच्या अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळतं हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.दरम्यान  विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी जनतेला दिलेली आश्वासने हे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर या अर्थसंकल्पात तरतूद करणार का ?  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Previous articleभारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली अभिनंदन….
    Next articleरवींद्र धंगेकर हे काॅग्रेसचा पंजा सोडून हाती घेणार धनुष्य बाण आज ठाण्यात पक्षप्रवेश

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here