Home राजकीय रवींद्र धंगेकर हे काॅग्रेसचा पंजा सोडून हाती घेणार धनुष्य बाण आज ठाण्यात...

    रवींद्र धंगेकर हे काॅग्रेसचा पंजा सोडून हाती घेणार धनुष्य बाण आज ठाण्यात पक्षप्रवेश

    47
    0

    पुणे दिनांक १० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्याचे कसबा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काॅग्रेस पक्षाचा पंजा सोडून हाती धनुष्य बाण घेणार आहे.त्यामुळे पुण्यात काॅग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार आहे.ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेना मध्ये प्रवेश करणार आहेत.दरम्यान लोकसभा निवडणूक नंतर ते पुण्यातील तसेच केंद्रीय नेतृत्वावर नाराज झाले होते.व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यां बरोबर त्यांची जवळीक वाढली होती.हे चित्र मागील काही दिवसांपासून पुण्यात बघायला मिळत होते.  तसेच यापूर्वी त्यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट देखील घेतली होती.त्यानंतर त्यांनी आता काॅग्रेस पक्षाला रामराम करत शिवसेनेत  जाण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान धंगेकर यांची लढावू कार्यकर्ता म्हणून पुण्यात ओळख आहे.तसेच ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणून त्यांची पुण्यात ओळख आहे.

    Previous articleराज्याच्या आज अर्थसंकल्प दोन्ही सदनात दुपारी सादर होणार
    Next articleचॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर राष्ट्रपतींकडून टीम इंडियाचे अभिनंदन

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here