Home कृषी महाराष्ट्रातील १२० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला तर ८७ ठिकाणी गळीत हंगाम...

    महाराष्ट्रातील १२० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला तर ८७ ठिकाणी गळीत हंगाम सुरू

    168
    0

    पुणे दिनांक २९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील १२० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असून या सर्व साखर कारखान्यांचा चालू वर्षांतील ऊस गाळप हंगाम संपला आहे.यात प्रामुख्याने सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील ८७ साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम अजून सुरू आहे.दरम्यान साखर कारखाना क्षेत्रांतील ऊस संपेपर्यंत हे सर्व साखर कारखाने सुरू राहणार आहेत.अशी माहिती साखर आयुक्तलयातून देण्यात आली आहे.

    दरम्यान या चालू वर्षी ऊस गळीत हंगाम हा १ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाला होता.सदरचा गळीत हंगाम सुरू होवून ४ महिने पूर्ण झाले आहे. तसेच सुरू असलेल्या साखर कारखाना क्षेत्रांतील ऊसाचे क्षेत्र असलेल्या भागातील साखर कारखाने हे संपूर्ण ऊस गाळप होवू पर्यंत चालू राहणार आहे. महाराष्ट्रात सहकारी व खासगी असे मिळून एकूण २११ साखर कारखाने आहेत.यात प्रामुख्याने सहकारी साखर कारखाने १०४ तर खासगी १०४ असे मिळून एकूण २०७ साखर कारखाने आहेत ‌.यापैकी आता एकूण १२० साखर कारखाना क्षेत्रांतील ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे.

    Previous articleसुपरस्टार गोविंदा अहुजांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश
    Next articleआज गुडफ्रायडे असल्यांने शेअर मार्केट व बॅंकांना सुट्टी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here