पुणे दिनांक १० मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुणे जिल्ह्यातील जेजुरी गडावरुन आली आहे.तमाम महाराष्ट्राचे श्रध्दास्थान व कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या दर्शनाला जेजुरी गडावर येणाऱ्या तमाम भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टच्या वतीने आजपासून घेण्यात आला आहे.दम्यान यासाठी ट्रस्टच्या वतीने यासाठीची नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे.यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय पध्दतीची वेशभूषा असेल तरच भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे.
दरम्यान श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीच्या विश्र्वस्त मंडाळाच्या वतीने घेण्यात आला आहे.त्यामुळे आता पाश्चिमात्य म्हणजेच वेस्टर्न कपडे परिधान करून भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही.तसेच पुरुष व महिला भावीकांना मंदिरात कमी कपड्यात मंदिरात प्रवेश मिळणार नाही.फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स. बरमुडा.शाॅर्ट. स्कर्ट.असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास जेजुरी गडावर येण्यास मनाई करण्यात येणार आहे.त्यामुळे भाविकांनी असे कपडे घालून दर्शनासाठी येऊ नये. असे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत.दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे.असे देखील मंदिर ट्रस्टने स्पष्ट केले आहे.