पुणे दिनांक ११ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट सकाळीच बीड जिल्ह्यातून आली असून.सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.परंतू खोक्या अद्याप फरार आहे.दरम्यान त्याची गाडी शिरुर कासार पोलिसांनी जप्त करण्याची कारवाई केली आहे.खोक्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.पिता-पुत्रांना मारहाण केल्याचा देखील गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.दरम्यान खोक्या भोसले हा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे.त्यामुळे आमदार सुरेश धस हे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान खोक्या भोसलेचे हे सर्व प्रकरण मिडियावर सर्वत्र प्रसिद्ध झाल्यानंतर खोक्या हा फरार झाला आहे.बीड जिल्हा गुन्हे शाखेच्या टीम त्यांचा पुणे व अहिल्यानगर येथे देखील शोध घेत आहेत.दरम्यान आज सतीश उर्फ खोक्या भोसले हा पोलिसांसमोर सरेंडर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तसेच तो पुणे किंवा अहिल्यानगर तसेच बीड पोलिसांसमोर सरेंडर करेल असे बोलले जात आहे.शेतात हारण पकडण्यासाठी वाघर म्हणजेच जाळी लावावी यावर स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला म्हणून खोक्याने शेतकरी व त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली होती.तसेच अन्य एकाला बॅटच्या सहाय्याने खोक्याने मारहाण केल्याप्रकरणांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.खोक्याकडे अवैध पैसा 💸 भरपूर आहे.तसेच तो दहा टक्के व्याजदराने पैसे देतो असा त्याच्यावर आरोप आहे.दरम्यान खोक्याच्या घरातून वन विभागाचे अधिकारी व पोलिसांनी हरण तसेच ससे पकडण्याचे जाळे तसेच धारधार कोयते तसेच जनवारांचे मांस जप्त केले आहे.दरम्यान मागील अनेक दिवसांपासून खोक्या हा फरार झाला आहे.