Home शैक्षणिक सिंहगड इन्स्टिट्यूटकडून पुणे महानगरपालिकेची तब्बल ३४५ कोटी रुपयांची थकबाकी, सिंहगड काॅलेजच्या ५०...

सिंहगड इन्स्टिट्यूटकडून पुणे महानगरपालिकेची तब्बल ३४५ कोटी रुपयांची थकबाकी, सिंहगड काॅलेजच्या ५० मिळकती पुणे महानगरपालिकेने केल्या जप्त यातील एकाचा लिलाव होणार?

181
0

पुणे दिनांक ११ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे.त्यामुळे पुण्यात शिक्षणाला महत्त्व आहे.राज्याच्या कानाकोपऱ्यातून तर इतर राज्यातील विद्यार्थी देखील पुण्यातील काॅलेज मध्ये प्रवेश घेतात.यात पुण्यातील सिंहगड काॅलेज हे देखील मोठ्या व नामावंत काॅलेज मध्ये मोडतं दरम्यान या सिंहगड काॅलेजच्या वतीने पुणे महानगरपालिकेची तब्बल ३४५ कोटी रुपयांची थकबाकी थकवली आहे. तसेच या संस्थेचे पुण्यात मोठं जाळं आहे.अनेक शाळा तसेच मेडिकल कॉलेज तसेच इंजिनियरिंग कॉलेज आहेत.आता यातील तब्बल एकूण ५० मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत.तसेच सिंहगड काॅलेजच्या एरंडवणे येथील मुख्य कार्यालयाला सुध्दा पुणे महानगरपालिकेच्या वतीने आज टाळे ठोकण्यात आले आहे.

दरम्यान पुणे महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणावर थकबाकी थकल्यामुळे पुण्यातील सिंहगड काॅलेजला महानगरपालिकेच्या वतीने चांगलाच दणका दिला आहे.त्यामुळे आज सिंहगड काॅलेजच्या मिळकती सील करण्यात आल्या आहेत.पुण्यातील विविध भागात असलेल्या सिंहगड काॅलेजच्या जवळपास ५० मिळकती जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान पुणे महापालिकेची तब्बल ३४५ कोटी रुपयांची थकबाकी सिंहगड काॅलेजकडे आहे.त्यामुळे  वडगाव बुद्रुक.तसेच कोंढवा.एरंडवणे येथील मिळकती महापालिकेच्या वतीने सिल करण्यात आल्या आहेत. तसेच एरंडवणे येथे असलेल्या सिंहगड काॅलेजच्या मुख्य ऑफिसला आज टाळे लावण्यात आले आहे. दरम्यान केवळ शैक्षणिक वर्षे सुरू असल्याने विद्यार्थी यांचे नुकसान होऊ नये म्हणून काॅलेज मधील वर्ग सुरू ठेवले आहेत.दरम्यान ही संस्था विद्यार्थीं यांना ढाल न बनवता विद्यार्थी यांच्या भविष्याचा विचार करून सदर पुणे महानगरपालिकेची थकबाकी भरणार का ? आता असा प्रश्न उपस्थित होत आहे.तसेच आता या संस्थेत नेहमीच काय ना काय उद्योग सुरू असतात कधी कामगारांचे पगार थकवले जातात तर कधी पुणे महापालिकेची थकबाकी मोठ्या प्रमाणावर थकवली जाती.त्यामुळे आता या संस्थेत पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात घोळ सुरू आहे.दरम्यान एरंडवण्यात असलेल्या सिंहगड काॅलेजची थकबाकी भरण्यासाठीची मुदत संपल्याने  पुणे महानगरपालिका त्या अस्वस्थपनेची लिलाव करण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे आता सिंहगड काॅलेजचे प्रशासन व संस्था अध्यक्ष मारुती नवले हे महापालिकेची देणी . तसेच थकबाकी दिली जाईल का.या वस्तूंचा लिलाव होईल हे लवकरच स्पष्ट होईल.

Previous articleपुणे स्वारगेट एसटी स्टँडवरील अत्याचार प्रकरणात एसटी महामंडळाचे चार अधिकारी निलंबित
Next article‘देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हटल्यावर उन्माद महाराष्ट्रात स्वाभाविक’, वृत्तपत्र प्रतिनिधी आरोपी पर्यंत पोहोचतात पोलिस खाते नाही ही गृहखात्याची शोकांतिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here