पुणे दिनांक १२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट आली असून आज १२ मार्च महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना मार्चच्या हाप्त्याची आता प्रतिक्षा संपली आहे.महायुतीच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बुधवार पर्यंत म्हणजेच १२ मार्च रोजी पात्र असलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी व मार्च महिन्यांचे एकूण ३ हजार रुपये जमा होतील असे सांगितले होते.तरी देखील अद्याप बहिणींना पैसे मिळाले नाहीत.दरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज १२ मार्चला हप्ता जमा व्हायला पाहिजे.त्यामुळे आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष मोबाईलच्या मेसेजकडे लागले आहे.