Home राजकीय शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा

    शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा विधानभवनावर मोर्चा

    34
    0

    पुणे दिनांक १२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई वरुन आली आहे.महायुती सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे.त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात १२ जिल्ह्यातील शेतकरी आज बुधवारी १२ मार्च रोजी मुंबईतील विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.दरम्यान काॅग्रेस पक्षाचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावरुन सदर मोर्चाला सुरुवात व्हईल दरम्यान नागपूर ते गोवा असा एकूण ८०५ किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग महायुती सरकार बनवत आहे.दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करु,असे आश्र्वासन आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.पण निवडणुका झाल्या नंतर या सरकारला विसर पडला असून आता शक्तीपीठ महामार्ग बनवण्याचे आदेश महायुती सरकारने दिले आहेत.त्यामुळे आता शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत आहे.

    Previous articleलाडक्या बहिणींना आजच मिळणार त्यांच्या खात्यावर जमा होणार फक्त १ हजार ५००
    Next articleपोलिसांनी 👮 खोक्या भोसल्यांच्या आवळल्या मुसक्या, आमदार धसांना झटका?

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here