Home क्राईम पुण्यातील शुक्रवार पेठेतील नंदू नाईक याचा मटक्याच्या धंदा सुरूच , मटका धंदा...

    पुण्यातील शुक्रवार पेठेतील नंदू नाईक याचा मटक्याच्या धंदा सुरूच , मटका धंदा घेणा-या त्याच्या पंटरसह तीन जणांच्या पुणे पोलिसांनी 👮 आवळल्या मुसक्या

    64
    0

    पुणे दिनांक १२ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुणे येथूनच आली आहे.पुण्यातील सर्वात जुना शुक्रवार पेठेतील मटका धंद्यात अधिराज्य गाजवणारा नंदू नाईक याच्या मटका अड्ड्यावर पुणे पोलिसांनी 👮 लगातार छापेमारी करून त्याचा धंदा बंद करण्याचा प्रयत्न केला पण तसेच पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या संयुक्त टीमने त्याच्या शुक्रवार पेठेतील रौनक बारवर अतिक्रमण कारवाई करुन तो पाडण्यात देखील आला आहे.तरी देखील नाईक हा पोलिसांच्या कारवाईला न घाबरता निर्भिडपणे त्याने मटका धंदा सुरूच ठेवला आहे.दरम्यान पुणे पोलिसांनी 👮 रौनक बारच्या समोर त्यांचे तीन पंटर हे कल्याण.वरळी.आणि मुंबई यावर मटक्याचे आकडे घेतांना तीन जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

    दरम्यान पोलिसांनी 👮 अटक केलेल्या पंटर लोकांची नावे १) सिध्दार्थ महादेव चव्हाण ( वय ४४ रा.जनता वसाहत पर्वती पायथा पुणे) २) बबन शामराव वरवंटे ( वय ५२ रा.विश्रांतवाडी पोलिस चौकी जवळ विश्रांत वाडी पुणे) ३) सुनील महादेव केतम ( वय ४९ रा.साई नगर सिंहगड रोड पुणे) अशी आहेत.या प्रकरणी पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार पोलिस अंमलदार युवराज नाईकरे यांनी खडक पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.दरम्यान नाईकरे हे  सायंकाळी साडेपाच वाजण्याच्य सुमारास शुक्रवार पेठेतील रौनक बारजवळ गेले असता बार समोर एक रिक्षाच्या आडोश्याला एकजण हातात मटक्याचे आकडे व पैसा 💸 घेऊन चिठ्ठ्या देत होता.दरम्यान पोलिसांनी 👮 मटका घेणारा व खेळणारे दोघेजण अशा तीन जणांना अटक केली आहे.दरम्यान चव्हाण याने आपण सांगितले की आपण मटका धंदा मालक नंदू नाईक याच्या मटका धंद्यावर रायटर म्हणून काम करत आहे.पोलिसांनी यावेळी जुगाराची साधने व रक्कम १९०५ रुपये जप्त केले आहेत.दरम्यान या प्रकरणी पुढील तपास पोलिस हवालदार दत्तात्रय चरपाले हे करीत आहेत.

    Previous articleपुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगलीच्या कारागृहात हलवले?

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here