पुणे दिनांक १४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही जळगाव येथून सकाळीच आली आहे.जळगाव ते बोल वड रेल्वे स्थानकाजवळ आज शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे.दरम्यान रेल्वे ट्रॅकवर गेट जवळ धान्याने भरलेला ट्रक आल्याने हा अपघात झाला असून यात ट्रकचा चक्काचूर झाला आहे.दरम्यान हा अपघात झाल्यानंतर या मार्गावरील आप आणि डाऊन दोन्ही मार्गांववरील वाहतूक व्यवस्था बंद झाली असून जळगाव रेल्वे स्थानका जवळ ८ ते १० एक्स्प्रेस ट्रेन उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेतील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या वतीने घटनास्थळी कर्मचारी दाखल झाले आहेत.ते अपघात ग्रस्त ट्रक बाजूला घेण्याचे काम सुरू आहे.दरम्यान अपघातग्रस्त ट्रक रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केल्यानंतर सदरची रेल्वे वाहतूक सुरळीत होईल असं रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.