पुणे दिनांक १७ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड हत्याकांड प्रकरणात नेमके काय घडले याची थोडक्यात माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.सदर चा युवक हा जालन्यातील रहिवासी आहे.त्याचे नाव विकास बनसोडे गेल्या चार वर्षांपासून पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामास होता.दरम्यान क्षीरसागर यांच्या अल्पवयीन मुलीशी विकास याचे प्रेमसंबंध सुरू आहेत.असा संशय त्याचा मालक क्षीरसागर यांना काही दिवसांपूर्वी आला त्यानंतर त्यांनी विकासला कामावरून काढून टाकले.तरी त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी विकास हा जालना येथून बीडला पिंपरी घुमरी येथे गेला व परत दोघांना भेटताना पाहिल्याने विकास बनसोडे याला दोन दिवस मारहाण करण्यात आल्याची चर्चा आहे.
दरम्यान या मारहाणीत विकास बनसोडे याचा मृत्यू झाला आहे , दरम्यान विकास बनसोडे याची हत्या प्रेम प्रकरणातून झाली आहे.असा गंभीर आरोप झाल्या नंतर बीड पोलिसांनी 👮 एकूण १० जणांच्या विरोधा मध्ये गुन्हा दाखल केला आहे.यात प्रकरणी पोलिसांनी १) भाऊसाहेब क्षीरसागर २) स्वाती क्षीरसागर ३) सुवर्ण क्षीरसागर.या तीन जणांना अटक करण्यात आली आहे.तर अन्य सातजण फरार झाले आहे. त्यांची नावे १) बाबासाहेब क्षीरसागर २) संकेत क्षीरसागर ३) संभाजी झांबरे ४) सचिन भंवर ५) सुशांत शिंदे ६) बापूराव शिंदे हे अद्याप फरार झाले आहेत.व बीडचे पोलिस यांचा शोध घेत आहेत.