पुणे २९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) रविवारी दिनांक ३० मार्च रोजी गुढीपाडवा असून गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. यादिवशी गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून पुसून घ्यातात.काठीच्या वरच्या टोकाला स्वच्छ साडी गुंडळली जाते.तसेच कडूलिंब व आंब्याची डहाळी तसेच फुलाची व साखरेच्या गाठीची माळ बांधून त्यावरच्या टोकाला कलश तांब्या त्यावर उपडा ठेवून घट्ट बसवतात तसेच काठीला अष्टगंध.हाळद.व कुंकू वाहतात.तसेच ईशान्य दिशेला गुढी उभारणे समुध्दीचे प्रतिक मानले जाते.
दरम्यान रविवारी शुभ मुहूर्त ३० मार्च सकाळी ४वाजून ४१ मिनिटांपासून ते सकाळी ५ वाजून २७ मिनिटां पर्यंत आहे.तसेच अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून १ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ५० मिनिटापर्यंत आहे.तर विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटां पासून ते दुपारी ३ वाजून १९ मिनिटापर्यंत आहे.तर गोधुली मुहूर्त संध्याकाळी ६ वाजून ३७ मिनिटांपासून ते ७ वाजेपर्यंत आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.आजच्या दिवशी नवीन व्यवसायची सुरुवात करतात तसेच नवीन वाहने घेतली जातात.