Home Breaking News आजच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले महत्त्वाचे ७ निर्णय

आजच्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले महत्त्वाचे ७ निर्णय

189
0

पुणे १५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  आज मंगळवारी मंत्रालयात कॅबिनेटची बैठक घेण्यात आली सदरच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण ७ निर्णय घेतले आहे ‌.१) चिखलोली -अंबरनाथ . जिल्हा ठाणे येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गन्यायालय स्थापन करणार तसेच त्या अनुषंगाने पदे मंजूर करण्यात आली आहे.२) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या निर्देशानुसार कैद्यांच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणास मंजुरी देण्यात आली आहे.३) नगरपरिषद.नगरपंचायती आणि औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तेच्या हस्तातरणां साठीच्या नियमांमध्ये बदलास मान्यता आजच्या कॅबिनेट मध्ये देण्यात आली आहे.

दरम्यान ४) लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.५) भूमिसंपादन.पुनर्वसन  पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम.२०१३ चे कलम ३० (३) ७२ व ८० मध्ये भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा करताना आकारण्यात येणाऱ्या व्याजदराच्या तरतुदी मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.६) नगरपरिषद व नगरपंचायती.औद्यागिक नगरीच्या नगराध्यक्षांना बहुमताने हटवण्याच्या तरतुदीस मान्यता.तसेच नगरपरिषदा . नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा करणार.६) महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ मध्ये सुधारणा नगरपरिषदा व नगरपंचायती औद्योगिक नगरी क्षेत्रा मधील मालमत्ता करावरील दंड अंशत: माफ करुन कर वसूलीसाठी व्हावी यासाठी अभय योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सात निर्णय घेण्यात आले आहे.सदर मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मंत्री मंडळाचे सर्व खात्याचे मंत्री उपस्थित होते.

Previous article‘M.Sधोनी -द अनटोल्ड स्टोरी ‘ तुम बस रन आऊट मत करना’
Next articleपुण्यात भरदिवसा सराफाला खेळण्यातील प्लास्टिकची बंदूक दाखवून दरोडा,३० तोळे सोने नेले लुटून सराफ झाला हक्काबक्का एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here