पुणे १६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक अपडेट पुण्यातूनच येत आहे.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराअभावी गर्भवती 🤰 महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला होता.दरम्यान या प्रकरणी शासकीय रुग्णालय ससून मधील एकूण ६ वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने या प्रकरणात ३ अहवाल तपासणी केली आहे.आज थोड्याच वेळात हे अहवाल ससून या शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता एकनाथ पवार हे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पाठवणार आहेत.
दरम्यान पुण्यातील शासकीय रुग्णालय ससून मधील एकूण ६ वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीमार्फत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सदरचा अहवाल तयार करण्यात आला आहे.दरम्यान यावर काल मंगळवारी दिवसभर ससून रुग्णालयात तज्ज्ञ समितीची बैठक सुरू होती. यात गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या मृतांची जबाबदारी नेमकी कुणाची यावर सबळ पुराव्यांवर मंथन करण्यात आले आहे.तसेच ही समिती अहवाल पोलिस आयुक्त व अलंकार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे सुपूर्द करणार आहे .व त्यानंतरच पुढील कारवाई होणार आहे.दरम्यान सदर प्रकरणी दीनानाथ मंगेशकर हाॅस्पिटल.सूर्या हाॅस्पिटल. व मणिपाल रुग्णालय.तसेच इंदिरा आयव्हीएफ फर्ट्रीलिटी सेंटर या रुग्णालयाने नोंदविण्यात आलेल्या जबाबाची तपासणी या सहा तज्ज्ञ समितीने केली आहे.