पुणे १८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील निलंबित पीएसआय रणजित कासले यांच्या पुण्यातील स्वारगेट येथील एका हाॅटेल मधून आज पहाटेच्या सुमारास मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान काल सायंकाळी कासले हे पुण्यातील विमान तळावर दाखल झाल्याझाल्या त्यांनी लगेच माध्यमांशी बोलताना एकच खळबळ उडवून दिली की.विधान सभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला आहे.असा दावाच कासले यांनी केला आहे.तसेच मी पुणे किंवा बीड पोलिसांकडे सरेंडर करणार असल्याचे सांगितले होते.परंतू आज पहाटेच्या सुमारास त्यांना बीड जिल्हा पोलिसांनी 👮 पुण्यातील स्वारगेट येथील एका हाॅटेल मधून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार दिल्ली येथून रणजित कासले हे विमानाने पुणे येथे आले होते.त्यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक दावा मिडिया बरोबर बोलताना केला आहे.” बोगस इन्काऊंटर बदल माहिती दिली केंद्र सरकारकडून ग्रिन सिग्नल मिळताच मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व गृहसचिव तसेच यांची तातडीने गुप्त मिंटींग होते. जसे मुंबईत अक्षय शिंदेचं झालं केंद्राच्या ग्रिन सिग्नल नंतर ४ ते ५ अधिकारी येतात.तसेच ते अधिकारी स्थानिक पातळीवरील ४ ते ५ अंमलदार निवडतात व नंतर त्यांच्या मार्फत बोगस इन्काऊंटर केला जातो. तशीच मला ऑफर दिली होती.कारण त्या ऑफरचे तुम्हाला पुरावे मिळणार नाहीत.कारण शासन व आयपीएस अधिकारी व आय.ए.एस अधिकारी हे खुप हुशार असतात.बंद दाराआड चर्चा होते.” असे देखील रणजित कासले यांनी यावेळी म्हणाले आहेत.” मला ऑफर अशी होती की.तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हाॅलवर घेऊन २४ तास रहा.तुम्हाला कुठलं चुकीचे वाटले तर कारवाई करावी,अशी ऑफर दिली होती. तसेच माझी अजून २५ वर्षांची नोकरी अजून राहिली असेलतर तेवढ्या माझा जेवढा पगार होईल समजा १५ कोटी तर तुम्हाला लमसम ५० कोटी मिळतील. तसेच चौकशी करताना देखील आमचं सरकार राहील या मधुन आम्ही निर्दोष मुक्त करु अशी ऑफर असते यावेळी कासलेंनी सुप्रसिद्ध इन्काऊंटर दया नायक व तसेच शर्मा यांच्या सारख्या ऑफीसर यांचे उदाहरण दिले आहे.