पुणे १८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही महाराष्ट्र मध्ये गाजलेल्या बीड जिल्ह्यातून येत आहे.कारण बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्यामुळे बीड जिल्हा हा देशातील नकाशावर आला , घटना तसेच सदरची घटना ताजी असतानाच आता बीड मध्ये पुन्हा एका ३६ वर्षीय महिला वकिलला १० ते १२ जणांच्या टोळीने चक्क रिंगण तयार करून काठ्यांनी व जेसीबीच्या वायरने मारहाण केली आहे.या मारहाणीत सदर महिला वकील यांचे पूर्ण शरीर काळे निळे पडले आहे. दरम्यान मारहाण झालेल्या महिला वकील यांचे नाव ज्ञानेश्वरी अंजान असं आहे.त्या आंबेजोगाई येथील सत्र न्यायालयात वकिली करतात त्यांना आंबेजोगाई येथील सनगाव येथे एका शेतात गावातील प्रतिष्ठित असं स्वाताला म्हणवणाऱ्या सरपंच व त्यांच्या अन्य कार्यकर्ते यांनी ही मारहाण केली आहे.गावात डीजे लावल्या बाबत तक्रार केल्यानंतर मारहाण झाल्याचे पीडितेने सांगितले आहे.त्यांनी या मारहाणी बाबत आंबेजोगाई पोलिस स्टेशन मध्ये रितसर फिर्याद दाखल केल्यानंतर यातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान यातील आरोपी हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असलेतरी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे.बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.दरम्यान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे उपमुख्यमंत्री अजित पवार हे असताना देखील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.दोनच दिवसांपूर्वी एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा खून झाला होता.अजित पवार हे कडक शिस्तीचे उपमुख्यमंत्री आहेत.व त्यांनी बीडच्या पालकमंत्री म्हणून सूत्र हाती घेताच आता एका एकाला सुतासारखा सरळ करतो अशी भीम गर्जना केली होती.त्याचे काय झाले.असा प्रश्न आता तेथील नागरिकांना नक्कीच पडला आहे.