पुणे १८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात दाखल होताच खळबळजनक दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या निलंबित पीएसआय रणजित कासलेंला आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट येथून एका हाॅटेल मधून बीड पोलिसांनी 👮 त्याच्या मुसक्या आवळल्या व त्याला बीड येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात घेऊन गेले.व नंतर त्याची शासकीय रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना बीड येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे.