पुणे १९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर तापमान वाढत आहे.तसेच उन्हाळ्याची चाहूल मोठ्या प्रमाणावर आहे.काही भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान याच पाणी प्रश्नावरून महायुतीचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी कलाकार दादा कोंडके यांच्या काळात दगडाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता.पाण्या अभावी नंतर एक लिटर पेंटचं टरमाळे आले आणी आता तर डायरेक्ट फ्लशचा वापर केला जातो.फ्लश केलं तरी एका दणक्यात १० लिटर पाणी वाया जाते.तसेच आता १ किंवा २ अपत्यांवर थांबा नाही तर लोकसंख्या वाढली तर चक्क ब्रम्हदेव आले तरी पाणी पुरणार नाही,असे अजब गजब वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.