Home क्राईम सोलापूर येथील डॉ.शिरिष वळसंगकर मृत्यू प्रकरणात चिठ्ठी सापडली, महिलेला अटक

    सोलापूर येथील डॉ.शिरिष वळसंगकर मृत्यू प्रकरणात चिठ्ठी सापडली, महिलेला अटक

    243
    0

    पुणे २० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशयन डॉ.शिरिष वळसंगकर यांनी शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कडील लायसन्स असलेल्या रिव्हाॅलवर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती.दरम्यान सदरच्या घटनेनंतर संपूर्ण सोलापूरात एकच खळबळ उडाली होती.दरम्यान त्यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण पुढे आले नव्हते.आता या प्रकरणात एक मोठी अपडेट पुढं आली आहे.दरम्यान आता एक चिठ्ठी सापडली आहे.सदरच्या चिठ्ठीत डॉ.शिरीष यांनी गंभीर आरोप केला आहे.त्यानुसार सोलापूर पोलिसांनी 👮 महिलेला न्यायालयाच्या परवानगीने अटक केली आहे.

    दरम्यान या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार डॉ.शिरीष यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.आता पुढं येत आहे.सदरच्या चिठ्ठीत डॉक्टरांनी एका महिलेवर गंभीर आरोप केलेले आहेत. दरम्यान त्याच आधारे सोलापूर पोलिसांनी 👮 न्यायालयाच्या परवानगीने सदर महिलेला अटक केली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव मनिषा मुसळे- माने असं आहे.ही महीला डॉ.शिरीष यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी पदावर अधिकारी आहे.या महिले मुळेच डॉ.शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आले आहे. या बाबत काल शनिवारी रात्री उशिरा मुसळे यांच्यावर पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान सदरच्या सापडलेल्या चिठ्ठीत डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी म्हटले आहे की.सदर महिलेकडे प्रशासकीय अधिकारी पदाची सूत्रे दिल्यानंतर या महिलेने माझ्यावर अंत्यंत गलिच्छ असे आरोप केले आहेत.ते गलिच्छ आरोप मला सहन होत नाही.त्यामुळे मी जीवन संपवत आहे.दरम्यान ही चिठ्ठी सोलापूर पोलिसांना सापडल्या नंतर पोलिसांनी मनिषा मुसळे – माने या महिलेच्या विरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून रात्रीच्या वेळी या महिलेला न्यायालयाची परवानगी घेऊन अटक केली आहे.

    Previous articleहेलिकॉप्टर तांत्रिक अडचणींमुळे अजित पवार यांचा नाशिक दौरा रद्द
    Next articleपुण्यातील न-हेतील युवती कुटुंबाबरोबर फिरायला गेली,वाॅटरपार्क मध्ये झिपलायनिंग करताना ३० फूटावरुन पडून दुर्दैवी मृत्यू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here