पुणे २२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील बैसरान येथे TRF या दहशतीवादी अतिरेकी संघटनांकडून ६ ते ७ अतिरेकी यांनी सैन्याच्या वेशात येऊन पर्यटकांना जात व नाव विचारुन त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे १) दिलिप डिसले २) अतुल मोने अशी नावे आहेत.
दरम्यान यात जखमी झालेल्या पर्यटाकांची नावे १) आसावरी जगदाळे (पुणे) २) प्रगती जगदाळे (पुणे) ३) संतोष जगदाळे (पुणे) ४) कौस्तुभ गणबोटे (पुणे) ५) संगिता गाबोटे तर अन्य दोन दाम्पत्य हे पुण्यातील कर्वेनगर येथील आहेत तर एक जण हा पनवेल मधील माणिक पाटील सर्वजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या सर्व जखमींना रुग्णालयात तातडीने उपचार मिळावेत यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडे मागणी केली आहे.दरम्यान लष्कर एक तोयबा यांची अन्य संघटना TRF या अतिरेकी संघटनेच्यावतीने हा हल्ला करण्यात आला आहे.तर सदर हल्ल्याची जबाबदारी लष्कर एक तोयबा संघटनेने घेतली आहे.यात अतिरेकी यांनी त्यांच्या तुकड्या बनवून पर्यटकांच्यावर हल्ला केला आहे. यात एकूण अतिरेकी संघटनेच्यावतीने एकूण ५० राउंड फायर करण्यात आले.यातील अतिरेकी हे सैनिकांच्या वेशात आले होते.दरम्यान गृहमंत्री अमित शाह हे जम्मू काश्मीर येथे दाखल झाले आहेत.भारतीय लष्करी सैन्याकडून या अतिरेक्यांचा शोध घेतला जात आहे.