पुणे २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील बैसरान येथे द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील ६ जण गंभीर रित्या जखमी झाले होते. दरम्यान त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.मृत्यू झालेल्या पर्यटाकांची नावे १)अतुल मोने २) संजय लेले ३) दिलिप डिसले ४) हेमंत जोशी ५) संतोष जगदाळे ६) कौस्तुभ गणबोटे अशी आहेत यातील जगदाळे व गनबोटे हे दोघेजण पुण्यातील कोंढवा भागात राहत होते.यातील गनबोटे यांचा व्यवसाय हा पुण्यातील रास्ता पेठेत आहे.तसेच अन्य तीन जण हे महाराष्ट्रातील असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत एस बालचंद्रू, सुबोध पाटील,शोबीत पटेल हे जखमी आहेत.दरम्यान ६ ते ७ अतिरेकी हे सैनिकांच्या वेशात येऊन पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला आहे.यात एकूण ५० राऊंड फायर करण्यात आले होते.दरम्यान पुण्यातील दोन पर्यटकांच्या मृत्यू नंतर कोंढव्यात शोककळा पसरली आहे.