पुणे ३० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज ३० एप्रिल २०२५ …आजचा दिवस हिंदू शास्त्रात शुभ मानला जातो.त्याचे कारण असे आहे की अक्षय तृतीया निमित्त भगवान विष्णू व भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची आजच्या दिवशी पूजा केली जाते.तसेच आजच्या अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य केल्यास ते शुभ मानले जाते.यात गरीब व गरजूंना अन्नदान करणे.धनदान करणे.इत्यादी आजच्या दिवशी शुभ मानले जाते.तसेच आजच्या दिवशी विशेष करून सोने व चांदीची खरेदी अनेकजण करतात तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात आजच्या दिवशी करतात.कोणी नवीन कार व दुचाकीची खरेदी करतात.तसेच कोणी नवीन फ्लॅट घेतात आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते.आजच्या अक्षय तृतीया या मंगलमय दिवसांच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा,