Home आध्यामिक केदारनाथ मंदिर फुलांनी सजले,हर हर महादेव मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले

केदारनाथ मंदिर फुलांनी सजले,हर हर महादेव मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडले

102
0

पुणे २ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक सकाळीच अपडेट ही केदारनाथ येथील आहे.सगळीकडे पांढरा शुभ्र बर्फ.वर गडद निळे शुभ्र आभाळ आणि यातच केशरी.पिवळे.व लाल अशा अनेक रंगीबेरंगी फुलांच्या सहाय्याने सजलेले श्री केदारनाथ धाम मंदिर.आज शुक्रवारी या मंदिराचे दरवाजे उघडले आहेत.हा सुंदर आणि मन तुप्त करणारा क्षण पाहण्यासाठी आज सकाळपासून इथे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.तसेच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग यांनी देखील हजेरी लावली.आणि आज त्यांच्या हस्तेच या मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहे.दरम्यान यावेळी हर हर महादेवच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.दरम्यान हा आजचा सुंदर सोहळा बघण्यासाठी या ठिकाणी या भागातील भाविकांनी सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.यात स्थानिक भाविकां बरोबर पर राज्यातील भाविक देखील इथे आले आहे.

Previous article१ मे महाराष्ट्र दिन! त्यागाचा व वेदनादायी इतिहास, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हुतात्म्यांना वाहिली श्रध्दांजली
Next articleराजधानी दिल्लीत तुफान पाऊस सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here