Home Breaking News अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे निधन

अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे निधन

132
0

पुणे २ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी अहिल्यानगर येथून एक दुःखदायक अपडेट हाती आली आहे.अहिल्यनगर येथील विधान परिषदेचे माजी आमदार व जिल्ह्याल जेष्ठ नेते अरुण काका जगताप यांचे निधन झाले आहे.दरम्यान अरुण काका जगताप यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तसेच अहिल्यनगर पालिकेचे नगराध्यक्ष.तसेच सलग दोन वेळा विधानपरिषदेचे आमदार म्हणून काम केले आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.तसेच अरुण काका जगताप यांना संपूर्ण अहिल्यानगरचे राजकरण ढवळून काढणारा नेता म्हणूनही त्यांना ओळखलं जायचं.

दरम्यान गेल्या महिन्यापासून अरुणकाका जगताप यांची प्रकृती चिंताजनक होती.त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले होते.दरम्यान आज शुक्रवारी उपचार दरम्यान पहाटे त्यांचें दुःखद निधन झाले आहे.वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते.दरम्यान अरुणकाका जगताप यांच्या निधनामुळे अहिल्या नगर येथे शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्र्तात पत्नी व दोन मुले.एक मुलगी.तसेच सुना नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान आज दुपारी ४ वाजता अहिल्या नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Previous articleराजधानी दिल्लीत तुफान पाऊस सर्वत्र रस्त्यावर पाणीच पाणी
Next articleआज पहाटे तीनच्या सुमारास गोव्यातील यात्रेत चेंगराचेंगरीत ७ भाविकांचा मृत्यू५० पेक्षा जास्त भाविक जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here