पुणे ७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातून येत आहे.पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान सदरची कारवाई ही हाॅटेल वैशाली व गुडलक कॅफेवर यांनी केलेलं अतिक्रमण महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने हटवण्यात आले आहे.दरम्यान या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज पुण्यात पुणे महानगरपालिकेच्या वतीने सायंकाळी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर व जंगली महाराज रस्त्यावर तसेच डेक्कन भागातील दुकाने व हाॅटेलवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करुन अतिक्रमण काढून टाकण्यात आले आहे.दरम्यान ही कारवाई अतिक्रमण विभागाच्या वतीने सायंकाळी गर्दीच्या वेळी करण्यात आली आहे.त्यामुळे या अतिक्रमण कारवाईचा फटका हा ग्राहकांना बसला आहे.