पुणे ८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पाकिस्तान मधील लाहोर येथे ड्रोनच्या सहाय्याने बाॅम्बस्फोट झाल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान एकामागोमाग एक धमाके होत आहे.या स्फोटामुळे नागरिकांची एकच धावपळ सुरू आहे.या ड्रोनच्या स्फोटानंतर लाहोरमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.लाहोर कॅन्टोन्मेंटकडे जाणाऱ्या वाॅल्टन रोडवर हा हल्ला झाल्यानंतर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.व नागरिक प्रचंड प्रमाणावर घाबरून रोडवर उतरले आहेत.
दरम्यान सकाळी सकाळी हे ड्रोनच्या सहाय्याने कोणी बाॅम्बस्फोट केला याबाबत पाकिस्तानकडे माहिती नाही.दरम्यान या ड्रोनच्या स्फोटानंतर लाहोरमध्ये नागरिक प्रचंड प्रमाणावर घाबरले आहेत.नागरिकां मध्ये एकच भीती निर्माण झाली आहे.