पुणे १० मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक दुःखद अशी अपडेट आली असून भारत – पाकिस्तान युद्ध सुरू असताना जम्मू काश्मीर येथील प्रशासनातील अधिकारी राज कुमार ठाकुर हे शहीद झाले आहेत.काश्मीरचे मुख्यमंत्री अमर अब्दुला यांनी याबाबत ट्विटरवर ही माहिती दिली आहे. सदर ची घटना हृदयद्रावक अशी घटना आहे.आम्ही सर्वोत्तम अधिका-याला गमावले आहे.दरम्यान काल राज कुमार ठाकुर हे उपमुख्यमंत्री यांच्या सोबत दौऱ्यावर होते.त्यांच्या घरावर पाकिस्तानने गोळीबार केला आहे.असे मुख्यमंत्री अब्दुला यांनी म्हटले आहे. दरम्यान राज कुमार ठाकुर हे हे राजौरी येथील अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त होते.