पुणे ११ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारत आणि पाकिस्तान युद्धामुळे भारतीय सैन्यदला मध्ये मोठ्या अनेक घटना घडत आहेत.दरम्यान सदर युद्धाबाबतची माहिती भारतीय DGMO व लष्कराची संयुक्तरीत्या पत्रकार परिषद सुरू आहे.सदरच्या पत्रकार परिषद मध्ये तिन्ही सेनेचे DGMO ऑपरेशन सिंदूरची माहिती यावेळी दिली.दरम्यान जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरान व्हाॅली मध्ये २६ पर्यटक यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर भारतीय लष्कराच्या वतीने ऑपरेशन सिंदूर चालविण्यात आले.व लष्कराच्या वतीने दहशतवादी संघटनेच्या ९ दहशतवादी तळावर अचूकपणे हल्ला करून त्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहे.व पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला आहे. दरम्यान ऑपरेशन सिंदूरचा उद्देश हा फक्त दहशतवादी यांना संपवणे हा आहे.दरम्यान भारतीय लष्कराच्या वतीने एकूण १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केले आहे.असे लेफ्टनंट जनरल राजीव यांनी म्हटले आहे.