पुणे १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंगळवारी CBSE board 10th Result 2025 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ( CBSE ) दहावीचा निकाल जाहीर केला आहे.दरम्यान CBSE निकालात ९३.६०% टक्के विद्यार्थी बोर्ड परीक्षा मध्ये पास झाले आहेत.दरम्यान मागील वर्षा पेक्षा पास होण्याचे प्रमाण हे ०.०६ ने वाढले आहे.या निकालात देखील ताईगिरी कायम आहे.मुलींनी मुलां पेक्षा २.३७% पेक्षा जास्त पाॅईट्सने आघाडी घेतली आहे.एकूण ९५% टक्के मुलींनी परीक्षांमध्ये पास झाल्या आहेत.यंदाच्या परीक्षा साठी एकूण २६ हजार ६७५ शाळांमधून एकूण २३ लाख ७२ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.त्यापैकी २२ लाख २१ हजार ६३६ हे विद्यार्थी पास झाले आहेत.दरम्यान मागील वर्षापेक्षा यावर्षी ९३.६६% टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.या वर्षी त्रिवेंदम आणि विजयवाडा या विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे.दरम्यान या दोन्ही विभागात सर्वाधिक ९९.७९ % टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
दरम्यान केंद्रीय विभागवारी निकाल या प्रमाणे आहे. त्रिवेंद्रम – ९९.७९% टक्के, विजयवाडा – ९९.७९% टक्के, बेंगळुरू – ९८.९०% टक्के, चेन्नई – ९८.७१% टक्के, पुणे – ९६.५४% टक्के, अजमेर – ९५.४४% टक्के, दिल्ली पश्चिम – ९५.२४% टक्के, दिल्ली पूर्व – ९५.०७ % टक्के, चंदीगड – ९३.७१ % टक्के, पंचकुला ९२.७७% टक्के, भोपळ – ९२.७१ % टक्के, भुवनेश्वर – ९२.६४% टक्के, पटणा – ९१.९०% टक्के, डेहराडून – ९१.६०% टक्के, प्रयागराज – ९१.०१% टक्के, नोएडा – ८९.४१% टक्के,व गुवाहाटी – ८४.१४% टक्के अशी आकडेवारी आहे.दरम्यान विद्यार्थ्यांनी मार्कशीट डिजीलाॅकर,व उमंग अॅपवर मिळणार! तसेच अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना डिजीलाॅकर व उमंग अॅपवर त्यांची मार्कशीट मिळेल.तुम्हाला तुमचा रोल नंबर लाॅग इन करावे लागेल.तसेच तुम्ही तुमच्या मोबाईलवर मार्टशीट डाउनलोड करु शकता . दरम्यान गुणवत्ता यादी जाहीर होणार नाही.याशिवाय निकालात कोणताही टाॅपर घोषित करण्यात आला नाही. दरम्यान मंडाळाच्या वतीने सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्थांना कोणत्याही मुलाला शाळा किंवा जिल्ह्याचा टाॅपर म्हणून घोषित करु नये.असे सक्त निर्देश मंडाळाच्या वतीने देण्यात आले आहेत.दरम्यान विद्यार्थ्यांना मुळ मार्कशीट त्यांच्या शाळेतूनच मिळेल. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या गुणपत्रिका ऑनलाइन तपसू शकतात.परंतू हे केवळ तात्पुरते आहे. विद्यार्थ्यांना त्यांची मुळे गुणपत्रिका शाळेतून मिळणार आहे.दरम्यान पुढील अभ्यासक्रमा साठी आणि इतर अधिकृत गोष्टींसाठी मूळ गुणपत्रिका आवश्यक आहे.ती विद्यार्थ्यांना शाळेतूनच घ्यावी लागेल.