पुणे १३ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात आज अवकाळी पावसाचे आगमन झाले असून पुण्यातील सिंहगडरोड भागात २० मिनटे चांगला दमदार पाऊस झाला आहे.दरम्यान या पावसा मुळे न-हे येथील गंधर्व चौकात मोठ्या प्रमाणावर पाणीच पाणी झाले व हा गंधर्व चौक पाण्याखाली गेला आहे.दरम्यान या भागात रस्त्यावर सर्वत्र पाणी झाले असून या पाण्यामुळे या भागातील नागरिकांना मात्र आता अडचणीचा सामना करावा लागत आहे.तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना देखील ता-यावरची कसरत करावी लागत आहे.दरम्यान मोठी वाहने या भागातून गेल्यावर पायी जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हे पाणी उडवत वाहनं जात आहे.दरम्यान हा भाग पुणे महानगरपालिकामध्ये समाविष्ट झाला आहे. पण या भागात नागरी सुविधा वाचून हा भाग वंचित आहे.या भागात आता फक्त ड्रेनेज लाईनचे काम सुरू .पण संबंधित ठेकेदाराने सर्वत्र खड्डे केल्याने पावसाचे पाणी या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर साचले आहे. संबंधित ठेकेदाराने हे खड्डे रस्त्याबरोबर न बुजवल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना या खड्ड्याचा त्रास होत आहे.दरम्यान पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हे हाल आहेत तर पाऊस सुरू झाल्यानंतर या भागातील रस्त्यावर सर्वत्र पावसाचं तळं नक्की होऊन नागरिक यांना हा त्रास होणार आहे.या भागातील नालेसफाईचे काम महानगरपालिकेच्या वतीने अद्याप करण्यात आले नाही.त्यामुळे देखील याचा त्रास होणार आहे. दरम्यान या वर्षी मागील वर्षापेक्षा मान्सून लवकर दाखल होणार आहे.त्यामुळे या भागातील नालेसफाईचे काम पुणे महानगरपालिकेच्या वतीने तातडीने हाती घ्यावे अशी मागणी या भागातील सर्वसामान्य नागरिकांची आहे.