पुणे १४ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.पुणे हे शिक्षणाचे माहेरघरात कायदा सुव्यवस्थे चा प्रश्न आता गंभीर बनला आहे.पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळाली आहे. दत्तवाडी भागात भरदिवसा कोयता गॅंगने एका तरुणा वर सपासप वार केले आहेत.दरम्यान संबंधित हल्ल्या मध्ये सदरचा तरुण गंभीर रित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा 📷 मध्ये कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान आज बुधवारी दुपारी २ ते ३ जणांच्या टोळक्याने एका तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला आहे.दरम्यान या कोयता हल्ला झाल्यानंतर या दत्तवाडी भागात नागरिकांना मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान दत्तावाडी पोलिस आता यातील आरोपींचा शोध घेत आहेत.दरम्यान कालच बिबवेवाडी येथे देखील कोयता गॅंगने एका युवकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती.त्यानंतर आज पुन्हा दत्तवाडी भागात कोयता हल्ला झाला आहे.दरम्यान आता पुण्यात भरदिवसा कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे.यातच पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर झाला हे दिसून येत आहे.दरम्यान पुणे पोलिसांनी 👮 कोयता गॅंगची त्यांच्या भागात धिंड काढली तरी कोयता गॅंगवर कोणत्याही प्रकारचा पोलिसांचा वचक राहिलेला नाही. हे देखील आता पुण्यात कोयता गॅंगने सिध्द केले आहे.