पुणे १६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) ‘ नरकातला स्वर्ग ‘ या पुस्तकामधून राज्यसभा खासदार व पत्रकार संजय राऊतांनी राजकारण एकच खळबळ माजवणारा गौप्यस्फोट केला आहे.गुजरात राज्यातील गोध्रा दंगलीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आरोपी होते.अमित शाहसुध्दा एका खून प्रकरणात आरोपी होते.असा धक्कादायक खुलासा राऊत यांनी या पुस्तकातून केला आहे.एवढेच नाही तर UPA च्या काळात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यावेळी अटक टळली,असा दावाच संजय राऊत यांनी केला आहे.
त्यावेळी गुजरात राज्यातील गोध्रा हत्याकांडादरम्यान सीबीआयसह अनेक चौकश्यांचा ससेमिरा सुरू होता . दरम्यान त्यावेळी केंद्रात व गुजरात राज्यात मोठा संघर्ष सुरू होता.यावेळी गुजरात सरकार मधील अनेक मंत्री व माजी गृहराज्यमंत्री अमित शहांना तुरुंगात टाकलं होतं.यावेळी शाह यांच्या खून प्रकरणी संबंधित व्यक्तीशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे थेट बोलले होते.दरम्यान बाळासाहेब ठाकरे व जेष्ठ नेते शरद पवारांनी कायद्याच्या चौकटीत राहून नरेंद्र मोदी व अमित शाह यांना मदत केली.असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे.दरम्यान या पुस्तकातून राऊत यांनी सगळं उकरून काढलं आहे.गोध्रा हत्याकांड दरम्यान कारवाईचा रोख हा गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्यावर होता.दरम्यान जनते मधून निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणे योग्य नसल्याचे जेष्ठ नेते शरद पवार यांचे मत होते. मोदींची अटक टळली .पण मोदी व शाह यांनी उपकराचे स्मरण किती ठेवले? तसेच अमित शाह यांना मदत केली,तेच शाह जेष्ठ नेते शरद पवार व महाराष्ट्राशी कसे वागले? दरम्यान त्यावेळी दैनिक सामना व बाळासाहेब ठाकरे मोदींच्या मागे खंबीरपणे उभे होते.पण ह्याच मोदींनी शिवसेना असूरी पध्दतीने फोडली, दरम्यान शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी अटक करण्यात आली होती.व ते शंभरपेक्षा जास्त दिवस ते तुरुंगात होते.व त्याच काळात त्यांनी तुरुंगात हे पुस्तक लिहिले आहे.दरम्यान त्यांच्या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे.