पुणे १६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती पावसाबाबत एक अपडेट आली असून पुढील ३ ते ४ तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यां मध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे.मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे.अशातच १३ जिल्ह्यांमध्ये पुढील ४ तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.यात पुणे.सातारा.आहिल्यानगर, रायगड, नाशिक, आणि छत्रपती संभाजीनगर, या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर जळगाव, जालना, सिंधुदुर्ग,व धाराशिव.या जिल्ह्या मध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे.या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.दरम्यान सोलापूरात जोरदार वारे सह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.दरम्यान वडगी गावात पाऊस पडला आहे.तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.त्यामुळे येथील नागरिकांना घरातील पाणी काढतांना अनेक नागरिक दिसत होते. तर अहिल्या नगर मध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत.तर राहुरी व राहता या भागात देखील पाऊस झाला आहे , तसेच वर्धा येथे देखील जोरदारपणे पाऊस सुरू आहे.