पुणे १७ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील परळी येथे समाधान मुंडेंच्या गॅंगने शिवराज दिवटे या तरुणाचे अपहरण करून त्याला जंगलात नेऊन लाठ्या काठ्या व बेल्टच्या सहाय्याने जबरदस्त मारहाण केली आहे.दरम्यान मारहाण करताना काही लोकांनी पाहिले व मारहाण करण्यास रोखले म्हणून या तरुणाचा जीव वाचला आहे.दरम्यान मारहाण करुन हे मारेकरी थांबले नाहीत तर त्या तरुणाला सर्वांच्या पाया पडायला लावलं आहे.दरम्यान या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान मारहाण करताना या टोळक्याने मारहाणीचा व्हिडिओ देखील काढला आहे.दरम्यान मारहाण करणारी ही सर्व पोरं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मोक्का कायद्याअंतर्गत जेल मध्ये असलेल्या.व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी मंत्री धनंजय मुंडे याचा साथिदार वाल्मीक कराड यांच्या गॅंग मधील आहेत.पोलिसांनी यातील ७ जणांना अटक केली आहे.तर अन्य फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.दरम्यान धनंजय मुंडे याच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत.व बीड जिल्हा पालकमंत्री म्हणून सुत्र हाती घेतल्यानंतर अजित पवार यांनी म्हटले होते की मी बीडचा पालक मंत्री असून एका एकाला सुतासारखा सरळ करतो पण ही अजित पवार यांच्या घोषणेला बीड मधील गुंडांनी सुरुंग लावला आहे.