पुणे २१ (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक मान्सून बाबत हवामान विभागाच्या वतीने अपडेट हाती आली असून, मान्सून यंदा लवकरच दाखल होणार आहे, दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजा नुसार मान्सून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये केरळच्या किनारपट्टीवर दाखल होत आहे, दरवर्षी १ जुनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. अरबी समुद्राचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला आहे.तसेच ईशान्य बंगालच्या उपसागर , तसेच ईशान्य भागातील काही भाग लवकरच मान्सून व्यापणार आहे, दरम्यान २७ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.