Home क्राईम पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे, अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू

    पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे, अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू

    183
    0

    पुणे २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातून आली आहे, दरम्यान काल व आज पुणे जिल्ह्यात तसेच शहरात मुसाळधार पाऊस कोसळत आहे,व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे, अशातच आज सोमवारी वादळीवाऱ्यासह पाऊस पडल्याने एक झाड अंगावर कोसळून एकाचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे, दरम्यान मृत व्यक्तीचे नाव राहुल जोशी (वय ३२ रा, पुणे) असे आहे, कर्वेनगर येथील अलंकार पोलिस चौकी जवळ सदरची घटना घडली आहे, दरम्यान या घटनेनंतर राहुल याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले,पण डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केले आहे, दरम्यान आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये शहरात नगरपालिकेच्या हद्दीत जुन्या घराची भिंत अचानकपणे कोसळून वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे,

    Previous articleपुणे जिल्ह्यातील कोंढवळ धबधब्याचे धडकी भरेल असे रौद्ररूप
    Next article‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांपासून जीवीतास धोका ‘ – संगिता भालेराव

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here