पुणे २७मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही अहिल्यानगर येथून आली आहे, दरम्यान आज मंगळवारी अहिल्यानगर जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास जोरदार व मुसाळधार पावसाने हजेरी लावली आहे,अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळकी,खडकी,खंडाळा ,गुंडेगाव, या भागात ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे, दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खडकी येथील भागातील वालुंबा नदीला अचानकपणे पूर आल्याने ५ जण अडकून पडले होते,मात्र अहिल्यानगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने व पोलिसांनी 👮 तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन यात अडकलेल्या ५ जणांना सुखरुपपणे बाहेर काढले आहे, दरम्यान आता या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला आहे, दरम्यान या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे,शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे,