पुणे ५ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पोलिस खात्यातील प्रामाणिक देव माणसांची अपडेट ही बंगळुरू येथून आली आहे, दरम्यान बुधवारी ४ जून रोजी बंगळुरू येथील एम.चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर क्रिकेट 🏏 मधील चाहते RCB…RCB.. तसेच विराट कोहली…विराट कोहली…,अशा घोषणा देण्यासाठी लाखोंच्या संख्येने चाहते क्रिकेट 🏏 पटूंना पाहण्यासाठी आले होते, दरम्यान यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत चालली होती आणि पोलिसांनी 👮 सौम्य असा लाठीचार्ज केला, त्यामुळे एकच गोंधळ उडाला व धावपळ सुरू झाली,यात मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी देखील झाली, दरम्यान अशा परिस्थितीत तैनात असणारे पोलिस नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले, वर्दीतील देवमाणसांने सगळ्यात आधी चिमुकल्यांना या गर्दीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,ही दोन बोलकी दुष्ये या फोटोमध्ये दिसत आहेत, या अधिका-यांच्या माणूसकीला सलाम ,