पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही भंडा-यातून आली आहे, सूत्रांनद्वारे मिळाले ल्या माहितीनुसार आज रविवारी भंडारा जिल्हाधिकारी यांच्या नियोजन समितीची बैठक सुरू असताना निधी वाटपावरून सत्ताधारी आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार व खासदार एकमेकांसमोर भिडले, दरम्यान काॅग्रेस पक्षाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी निधी वाटपात दुजा भाव होत असल्याचा आरोप केला.त्यावरुन भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर आणि काॅग्रेस पक्षाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यात वाद उत्पन्न झाला.