पुणे ८ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पाऊसा संदर्भात अपडेट आली आहे, महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पावसाबाबत अंदाज वर्तविला आहे, दिनांक १२ ते २० जून या कालावधीत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे,असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, कोकण, खान्देश, मराठवाडा, सगळीकडे दिनांक १२ जून पासून पाऊस पडणार आहे, शेतकरी वर्ग १२ जून पर्यंत पेरणी करु शकतात,असे देखील त्यांनी म्हटले आहे,