पुणे ९ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही मुंबई मधून आली आहे,आज सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई मधील मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका तरुण जीआरपी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव विकी बाबासाहेब मुख्यादल असं नाव आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कसारा लोकल प्रवाशांनी खचाखच अशी भरलेली होती,काही प्रवासी हे सकाळी कामावर जाण्यासाठी लटकून प्रवास करत होते,त्याच वेळी डाऊनची लोकल या अपच्या लोकलला घासून गेली यात किमान १० ते १२ लोंबकळत असलेले प्रवासी हे रेल्वे ट्रॅकवर पडले मात्र या दुर्घटनेत एकूण ६ प्रवासी यांचा यात दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे, तर काही प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना कळवा येथील शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.यात काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे,